सामाजिक व्यक्तिमत्व व तृतीयपंथी सामाजिक गौरव पुरस्कार सोहळा
२०२५
माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ महाराष्ट्र राज्य वृंदा सामाजिक फाउंडेशन इचलकरंजी आणि सतर्क न्यूज चॅनल इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने एक अत्यंत सन्माननीय व सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असा सामाजिक व्यक्तिमत्व व तृतीयपंती सामाजिक गौरव पुरस्कार सोहळा 2025 दिनांक 23 जुलै 2025 बुधवार रोजी सकाळी 10 ते दुपारी चार या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यास कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते तसेच तृतीयपंथी समुदायातील ज्येष्ठ गुरु गोसावी आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथी बांधव उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज आयोजकांनी समाज कल्याण विभाग कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी कार्यालय अन्नधान्य वितरण विभाग संजय गांधी पेन्शन योजना कार्यालय हातकनंगले तहसीलदार कार्यालय कोल्हापूर आयुक्त कार्यालय इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त कार्यालय आणि इतर अनेक मान्यवर संस्थांना भेट देऊन या सोहळ्याचे निमंत्रण दिले सर्वांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम नसून केवळ पुरस्कार समारंभ नसून समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन समानतेचा आदराचा आणि आत्मसन्मानाचा उत्सव साजरा करण्याचा एक ऐतिहासिक क्षण आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तृतीयपंती समुदाय सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि सामाजिक परिवर्तनाची नाळ जपणाऱ्या प्रत्येकाने या सोहळ्यास उपस्थित राहूनइतिहासाचा भाग व्हावे असे आयोजकांचेआग्रही आमंत्रण आहे.
0 Comments